"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही" : मनोज जरांगे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 29 August 2025

"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही" : मनोज जरांगे पाटील


मुंबई :-  "सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हते, त्यामुळे आपण मुंबईला यायचे ठरवले होते आणि मुंबई जाम करायची ठरवली होती. पण आता सरकार आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळे कुणीही चुकीचे पाऊल उचलू नका. आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून माझे आमरण उपोषण सुरु झाले आहे. आता आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय इथून हलायचं नाही," असे मनोज जरांगे पाटील सोबत आलेल्या मराठा बांधवांना म्हणाले. ठरल्याप्रमाणे आज सकाळी १०च्या सुमारास मनोज जरांंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तेथे येताच त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.

       "सुरूवातीला सरकार सहकार्य करत नव्हते, पण आता सरकार सहकार्य करत आहे. या मैदानात आंदोलन करण्याची आपल्याला परवानगी दिली गेली आहे. मुख्यमंत्री आणि इतरांना माझे एकच सांगणे आहे की, तुम्ही आता आमच्याशी चर्चा करण्यासाठी या. आम्ही आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय येथून उठणार नाही. कार्यकर्त्यांनी दोन तासांत मुंबई खाली करावी. उगाच सर्वसामान्य जनतेची आपल्या आंदोलनामुळे गैरसोय होऊ नये. तसेच, आंदोलनात आलेल्यांनी मद्यपान करायचे नाही. कुठलाही अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही. रस्ते किंवा इतर सुविधा अडवायच्या नाहीत. आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आता जेलमध्ये जावे लागले तरीही चालेल, पण आमरण उपोषण थांबणार नाही," असेही जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages